प्रभावी तारीख: 30 एप्रिल 2026
या Roblox सबस्क्रिप्शन अटी ("सबस्क्रिप्शन अटी") Roblox कॉर्पोरेशन आणि त्यांच्या सहयोगी ("Roblox", "आम्ही", किंवा "आम्हाला") द्वारे प्रदान केलेल्या सबस्क्रिप्शन उत्पादनांचा ("सबस्क्रिप्शन") तुमचा अॅक्सेस आणि वापर नियंत्रित करतात.
सबस्क्रिप्शन खरेदी करून, तुम्ही या सबस्क्रिप्शन अटींशी तुमची समज, स्वीकृती आणि सहमती दर्शवता. या सबस्क्रिप्शन अटी तुमच्या (“युजर”, “तुमचे”, किंवा “तुम्ही”) आणि Roblox यांच्यातील कायदेशीर बंधनकारक करार आहेत. तुम्ही कोणत्याही सबस्क्रिप्शन अटींशी सहमत नसल्यास, तुम्ही सबस्क्रिप्शन अॅक्सेस करू शकत नाही किंवा वापरू शकत नाही.
या सबस्क्रिप्शन अटी Roblox वापराच्या अटी ("वापराच्या अटी") यांना पूरक आहेत, ज्या या सबस्क्रिप्शन अटींमध्ये संदर्भानुसार समाविष्ट केल्या आहेत. या सबस्क्रिप्शन अटी आणि वापराच्या अटींमध्ये कोणताही विरोधाभास असल्यास, या सबस्क्रिप्शन अटी सबस्क्रिप्शनचा अॅक्सेस आणि वापर नियंत्रित करतील. इथे वापरल्या जाणाऱ्या, पण परिभाषित न केलेल्या कॅपिटल केलेल्या संज्ञांचा अर्थ वापराच्या अटींमध्ये दिलेल्या अर्थासारखाच असेल.
सामान्य
पात्रता: सबस्क्रिप्शन फक्त लोकांना त्यांच्या वैयक्तिक, गैर-व्यावसायिक वापरासाठी प्रदान केले जाते. आम्ही ज्या देशांमध्ये सबस्क्रिप्शन देऊ करतो त्या देशांचे रहिवासीच सबस्क्रिप्शन खरेदी करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा: सबस्क्रिप्शन खरेदी करण्यासाठी तुमचे वय 18 वर्षे (किंवा तुमच्या राहत्या देशात कायदेशीर प्रौढत्वाचे वय) असणे आवश्यक आहे. तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास (किंवा तुमच्या राहत्या देशात कायदेशीर प्रौढत्वाच्या वयापेक्षा कमी असल्यास), तुमच्या आईवडिलांनी किंवा कायदेशीर पालकांनी तुमच्यासाठी सबस्क्रिप्शन खरेदी करणे आवश्यक असेल.
सबस्क्रिप्शन लाभ
आमच्या वेबसाइटवर तुम्हाला प्रत्येक सबस्क्रिप्शन आणि त्याच्याशी संबंधित लाभांचे वर्णन मिळेल. Roblox कधीही आणि कोणत्याही कारणास्तव सबस्क्रिप्शन लाभ अपडेट करण्याचा अधिकार, स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार राखून ठेवते. वेळोवेळी, Roblox बोनस लाभांसारखे अतिरिक्त लाभदेखील देऊ शकते. अशा बोनस लाभांची हमी दिली जात नाही, ते सर्व युजर्ससाठी उपलब्ध नसू शकतात आणि ते दर महिन्याला बदलले जाऊ शकतात किंवा पूर्णपणे Roblox च्या विवेकबुद्धीनुसार बंद केले जाऊ शकतात.सबस्क्रिप्शन शुल्के आणि पेमेंट्स
ऑटोमॅटिक रिन्यूअल: तुमचे सबस्क्रिप्शन प्रत्येक बिलिंग कालावधीच्या सुरुवातीला आपोआप रिन्यू होईल आणि तुम्ही ते रद्द करेपर्यंत अनिश्चित काळासाठी सुरू राहील.
सबस्क्रिप्शन शुल्के: तुम्ही सबस्क्रिप्शन खरेदी करता, तेव्हा तुम्ही निवडलेल्या सबस्क्रिप्शनसाठी शुल्क भरणे आवश्यक असते ("सबस्क्रिप्शन शुल्के"). लागू कायद्याने अन्यथा आवश्यक नसल्यास किंवा खरेदीच्या वेळी अन्यथा सूचित केल्याशिवाय, सबस्क्रिप्शन शुल्कांमध्ये कोणतेही लागू कर वगळले जातात. लागू कायद्यानुसार आम्हाला आवश्यक असल्यास, आम्ही सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला कर आकारू आणि तो गोळा करू. तुमच्या अधिकारक्षेत्रावर आणि तुमच्या बँकिंग पुरवठादारावर अवलंबून, तुम्ही सबस्क्रिप्शन खरेदी करता, तेव्हा तुम्हाला अतिरिक्त शुल्के (उदा. परदेशी व्यवहार शुल्क) आकारली जाऊ शकतात. सबस्क्रिप्शन शुल्के देश किंवा प्रदेशानुसार बदलू शकतात आणि तुम्ही तुमचा निवासी देश बदलल्यास, आम्ही तुमचे सबस्क्रिप्शन शुल्क अपडेट करण्याचा अधिकार राखून ठेवतो.
तुम्हाला वाजवी सूचना दिल्यानंतर सबस्क्रिप्शन शुल्के कधीही बदलण्याचा किंवा नवीन शुल्के जोडण्याचा आम्हाला अधिकार आहे. अन्यथा सांगितले नसल्यास, सबस्क्रिप्शन शुल्कांमधील बदल तुमच्या पुढील बिलिंग तारखेपासून प्रभावी होतील. तुम्ही किमतीमधील बदलाशी सहमत नसल्यास, किमतीमधील बदल लागू होण्यापूर्वी तुम्ही तुमचे सबस्क्रिप्शन रद्द करणे आवश्यक आहे. सबस्क्रिप्शन वापरणे पुढे सुरू ठेवून, तुम्ही नवीन आवर्ती सबस्क्रिप्शन शुल्क स्वीकारत असल्याचे दर्शवता.
पेमेंट: तुम्ही सबस्क्रिप्शन खरेदी करता, तेव्हा तुम्हाला पेमेंट पद्धत निवडण्यास सांगितले जाईल. Roblox ला ही पेमेंट माहिती देऊन, तुम्ही हे दर्शवता, की तुम्ही प्रौढ आहात आणि तुम्ही निवडलेल्या पेमेंट पद्धतीचा वापर करण्यास अधिकृत आहात व तुम्ही प्रदान केलेली कोणतीही पेमेंट माहिती अचूक आहे. सबस्क्रिप्शन खरेदी करून, तुम्ही Roblox किंवा नियुक्त केलेल्या तृतीय पक्ष पेमेंट पुरवठादाराला सबस्क्रिप्शन शुल्काचे पेमेंट करण्याकरिता तुमची पेमेंट माहिती गोळा करण्यासाठी आणि वापरण्यासाठी व तुम्ही सबस्क्रिप्शन रद्द करेपर्यंत आवर्ती आधारावर निवडलेल्या पेमेंट पद्धतीवर सबस्क्रिप्शन शुल्क आपोआप आकारण्यास अधिकृत करता.
रिफंड्स, ट्रान्सफर्स आणि विड्रॉवल्स: सबस्क्रिप्शन परत न करण्यायोग्य आहेत आणि ट्रान्सफर करण्यायोग्य नाहीत. कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत, तुम्ही असे कोणतेही वैधानिक अधिकार सोडून देण्यास सहमत आहात जे अन्यथा तुम्हाला रिफंड मिळवण्याचा अधिकार देऊ शकतात, जसे की पैसे काढण्याचा कोणताही अधिकार किंवा तुमच्या सुरुवातीच्या खरेदीनंतर उपलब्ध असलेला "कूलिंग ऑफ" कालावधी (उदाहरणार्थ, युरोपियन युनियनमधील लोकांसाठी 14 दिवसांचा कालावधी). अधिकार सोडत नाही, तोपर्यंत असे अधिकार लागू राहणे पुढे सुरू राहू शकते आणि तुम्ही रद्द करण्यासंबंधित खालील माहिती वापरून विड्रॉ करू शकता.
रद्द करणे
इथे दिलेल्या सूचनांचे पालन करून तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवरून सबस्क्रिप्शन खरेदी केले आहे त्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही तुमचे सबस्क्रिप्शन कधीही रद्द करू शकता. तुमचे सबस्क्रिप्शन आपोआप रिन्यू होऊ नये आणि पुढील बिलिंग कालावधीसाठी तुमच्याकडून सबस्क्रिप्शन शुल्क आकारली जाऊ नये यासाठी तुम्ही तुमच्या पुढील बिलिंग तारखेपूर्वी तुमचे सबस्क्रिप्शन रद्द करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे सबस्क्रिप्शन रद्द केल्यास, अन्यथा सूचित केल्याशिवाय, रद्द करणे तुमच्या सध्याच्या बिलिंग कालावधीच्या शेवटी प्रभावी होईल. तुम्ही ज्या कालावधीसाठी पैसे दिले आहेत त्या कालावधीसाठी तुम्हाला तुमच्या सबस्क्रिप्शनचा अॅक्सेस आणि वापर सुरू राहील. तुमचे सबस्क्रिप्शन संपल्यावर, तुम्हाला सबस्क्रिप्शन किंवा त्यांच्याशी संबंधित लाभांचा अॅक्सेस नसेल. तुम्ही त्यावेळच्या सद्य सबस्क्रिप्शन शुल्कांच्या किंमतीवर सबस्क्रिप्शन पुन्हा सबस्क्राइब करू शकता.
समाप्ती आणि निलंबन
Roblox, स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार आणि पूर्वसूचना न देता, कधीही सबस्क्रिप्शन (किंवा त्याच्या कोणत्याही भागाचा) तुमचा अॅक्सेस निलंबित करण्याचा किंवा समाप्त करण्याचा अधिकार राखून ठेवते. निलंबन किंवा समाप्तीच्या कारणांमध्ये समाविष्ट आहे, पण त्यापुरते मर्यादित नाही, (i) या सबस्क्रिप्शन अटींचा भंग किंवा उल्लंघन; (ii) तुमच्याकडून विनंती; (iii) तुमच्याकडून देय असलेल्या कोणत्याही सबस्क्रिप्शन शुल्कांचे पेमेंट न करणे; (iv) अनपेक्षित तांत्रिक किंवा सुरक्षा समस्या अथवा सेवेतील किंवा सबस्क्रिप्शनमधील समस्या; अथवा (v) कायदा अंमलबजावणी किंवा इतर सरकारी एजन्सीकडून कायदेशीर विनंत्या. काही प्रकरणांमध्ये, तुम्हाला अपील करण्याचा अधिकार असू शकतो. अपील प्रक्रिया सुरू करण्यासाठी, Roblox सपोर्ट फॉर्म वापरून Roblox सपोर्टशी संपर्क साधा.
विवादाचे निराकरण
महत्त्वाचे: वापराच्या अटींमध्ये बंधनकारक अनिवार्य अनौपचारिक विवाद निराकरण, मध्यस्थी आणि सामूहिक कारवाईचा त्याग यांच्या तरतुदींचा समावेश आहे. तुम्ही युनायटेड स्टेट्समध्ये राहत असल्यास मध्यस्थी आणि सामूहिक कारवाईचा त्याग याच्या तरतुदी लागू होतात. या सबस्क्रिप्शन अटींमधून उद्भवणारा किंवा त्यांच्याशी संबंधित कोणताही वाद अथवा क्लेम वापराच्या अटींमधील विवाद निराकरण तरतुदींच्या अधीन आहे.
अधिकृत वापर
तुम्ही Roblox किंवा Roblox सेवांच्या इतर युजर्ससाठी बेकायदेशीर, दिशाभूल करणारे किंवा फसवे अशा कोणत्याही प्रकारे सबस्क्रिप्शन वापरणार नाही असे मान्य करता.
तुम्ही तुमच्या सबस्क्रिप्शनच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार आहात हे तुम्ही समजता, मान्य करता आणि सहमती दर्शवता. तुमच्या सबस्क्रिप्शनचा कोणताही अनधिकृत वापर किंवा सुरक्षेचा कोणताही इतर भंग झाला आहे असे तुम्हाला वाटत असल्यास (आणि विनंती केल्यास कोणतेही कागदोपत्री पुरावे देण्यास) तुम्ही Roblox ला ताबडतोब सूचित करण्यास सहमती दर्शवता. तुमच्या कृतींमुळे किंवा कृती करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, जसे की कोणीतरी तुमचे सबस्क्रिप्शन तुमच्या माहितीने किंवा नकळत वापरत असल्यास, त्यामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी Roblox जबाबदार राहणार नाही.
तुमचे प्रत्यक्ष भौगोलिक स्थान लपवणाऱ्या किंवा तुमच्या स्थानाची चुकीची माहिती देणाऱ्या (उदाहरणार्थ, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN)) कोणत्याही यंत्रणेचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही सबस्क्रिप्शन खरेदी करू शकत नाही.
सबस्क्रिप्शन अटींमधील बदल
आमच्या विवेकबुद्धीनुसार वेळोवेळी या सबस्क्रिप्शन अटी बदलण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आम्ही या सबस्क्रिप्शन अटींमध्ये बदल केल्यास, आम्ही आमच्या वेबसाइटवर सबस्क्रिप्शन अटींची सर्वात नवीनतम आवृत्ती पोस्ट करू आणि प्रभावी तारीख अपडेट करू व आम्हाला असे करणे आवश्यक किंवा योग्य वाटल्यास, तुम्हाला सूचना देऊ. तुम्ही बदल न स्वीकारल्यास आणि सहमत नसल्यास, तुम्ही तुमचे सबस्क्रिप्शन रद्द करू शकता. सबस्क्रिप्शन वापरणे सुरू ठेवून, तुम्ही कोणत्याही अपडेट केलेल्या सबस्क्रिप्शन अटींना तुमची स्वीकृती दर्शवता.
या सबस्क्रिप्शन अटींमधील काहीही कोणत्याही अधिकारक्षेत्रात किंवा प्रदेशात बदल करण्याची अथवा सबस्क्रिप्शन काढून टाकण्याची, मर्यादित, प्रतिबंधित करण्याची किंवा अन्यथा बंद करण्याची Roblox ची क्षमता मर्यादित करत नाही, ज्यामध्ये लागू कायद्याचे पालन करणे, भौतिक सुरक्षा धोक्याचे निराकरण करणे अथवा मोठ्या प्रमाणात आर्थिक किंवा भौतिक तांत्रिक भार टाळणे समाविष्ट आहे. आम्ही कोणत्याही अधिकारक्षेत्रात किंवा प्रदेशात सबस्क्रिप्शन अथवा सबस्क्रिप्शनचा कोणताही भाग काढून टाकण्याचा, लक्षणीयरीत्या मर्यादित, प्रतिबंधित करण्याचा किंवा अन्यथा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास, आम्ही तुम्हाला वाजवी सूचना देऊ.
सूचना
Roblox तुम्हाला पाठवणाऱ्या कोणत्याही सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (i) तुम्ही दिलेल्या शेवटच्या ईमेल अॅड्रेसवर ईमेलद्वारे पाठवेल; किंवा (ii) सेवांवर किंवा त्यांच्या आत सूचना पोस्ट करेल; अथवा (iii) Roblox च्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार योग्य वाटणारी सूचना देण्याची इतर कोणतीही पद्धत वापरेल. आमच्याकडून येणाऱ्या सूचना आणि इतर संभाषणांसाठी तुमची संपर्क माहिती यासह अचूक, सद्य व संपूर्ण माहिती प्रदान करण्यास आणि राखण्यास तुम्ही सहमती दर्शवता.
संपर्क
तुमचे काही प्रश्न असल्यास तुम्ही Roblox सपोर्ट फॉर्म वापरून Roblox सपोर्टशी संपर्क साधू शकता.